आता कुणब्याच पोर खासदार होणार !!

परभणी लोकसभा निवडणूक २०२४ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माननीय 

श्री. किशोरभाऊ राधाकिशन ढगे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.

मानवत तालुक्यातील सावळी येथील सिद्धेश्वरा (महादेवा) च्या चरणी नतमस्तक होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ ढगे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत घेतली ऊडी.. आज दि ०१/०४/२०२४ वार सोमवार रोजी सावळी या गावात झालेल्या बैठकीत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या, सर्व सामान्य शेतमजूराच्या प्रश्ना बरोबरच मराठा आरक्षणावर रोखठोक भुमिका घेऊन या लोकसभेला सामोरे जाणारं. या आजच्या बैठकी नंतर लोकांनी लोकवर्गणी गोळा करून ८६५० रुपये निधी दिला. येणाऱ्या काळात प्रत्येक समाजातील प्रत्येक घटका प्रयत्न पोहचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत करीत राहीलं. ही लोकसभा प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात विस्थापित भुमी हिन पुत्रा बरोबरच. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच आहे. या महादेवाला साक्षी मानून शपथ घेतो की मी निवडणूकीचा निकाल काहीही लागो पण मी गावगाड्यातील सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीलं. तसेच दि.०३/०४/२०२४ वार बुधवार रोजी निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी स्वखर्चाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती करतो..